सांगवी ता.देवळा जि.नाशिक
sangavi196512@gmail.com
सुचना :
सांगवी हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात देवळा तालुक्यातील एक प्रगतशील व कृषिप्रधान असे गाव आहे. २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे १५५४ आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ३, अंगणवाडी केंद्र ४ ग्रीन जिम अशी शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच हनुमान मंदिर पीर बाबा मंदिर व महादेव मंदिर हे मंदिर प्रसिद्ध देवस्थान आहे. सामुदायिक सभामंडप, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.
गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून अधिकतर कांदा, बाजरी, गहू व मका ही प्रमुख पिके घेतली जातात. कांदा व मका या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते.
सांगवी ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत शेकडो घरांना लाभ मिळाला आहे.तसेच सन २०२४/२५ या वर्षात घरकुल मध्ये उकृष्ट कामाबाबत तालुका स्तरीय पुरस्कार मिळाले आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सांगवी गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF+) दर्जा मिळवला आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात.
ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.
आज आदर्शतेकडे वाटचाल करणारे गाव म्हणून सांगवी हे महाराष्ट्राच्या नकाशावर झळकत आहे.
सांगवी हे गाव महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात, देवळा तालुक्यात आहे. हे गावखान्देश व उत्तर महाराष्ट्र प्रदेशात येते आणि नाशिक विभागात मोडते.
सांगवी हे जिल्हा मुख्यालय नाशिकपासून अंदाजे ८५ किमी अंतरावर आहे. देवळा पासून साधारण २० किमी अंतरावर आहे. राज्याची राजधानी मुंबईपासून हे गाव अंदाजे २५५ किमी अंतरावर आहे.
सांगवी गावाचा पिन कोड 423110 आहे आणि त्याचे पोस्टल मुख्य कार्यालय उमराणे येथे आहे
सांगवी जवळची गावे अशी आहेत:
उमराणे,तिसगाव,चिंचवे,उसवाड,राहूड
येवला, चांदवड बागलाण (सटाणा) नांदगाव व मालेगाव हे तालुके सांगवीच्या जवळचे आहेत.
सटाणा,कळवण,मनमाड,मालेगाव,चांदवड.येवला हे शहरे जवळ आहेत
सांगवी हे गाव कृषीप्रधान आणि पारंपरिक जीवनशैलीसाठी ओळखले जाते. शेती हा गावकऱ्यांचा मुख्य व्यवसाय असून कांदा, बाजरी, मका आणि विविध हंगामी भाज्या यांची लागवड येथे मोठ्या प्रमाणावर केली जाते. शेतीव्यतिरिक्त काही लोक दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन तसेच लघुउद्योग या क्षेत्रांतही कार्यरत आहेत.
गावात सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा दृढपणे जपल्या जातात. वर्षभर साजरे होणारे सण-उत्सव, ग्रामदैवतांची पूजाअर्चा हे गावाच्या एकात्मतेचे प्रतीक मानले जाते. ग्रामीण जीवन शैली व संस्कृती जोपासली जाते सांगवीची बोलीभाषा अहिराणी व मराठी आहे . गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र यांसह स्थानिक देवतांच्या (पिरबाबा ) जत्रांना विशेष महत्त्व आहे.
येथील लोक मेहनती, मदत करणारे आणि ‘अतिथी देवो भव’ या मूल्यांना आचरणात आणणारे आहेत. तसेच येथे लोकसहभाग मोठ्या प्रमाणत आहे.ग्रामविकासात तरुण आणि महिला वर्गाचा सहभाग आहे. तरुण पिढी शिक्षण, खेळ व रोजगाराच्या संधी शोधून प्रगतीकडे वाटचाल करत आहे.
सांगवीच्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेचा स्पर्शही आढळतो, ज्यामुळे गाव विकास आणि एकतेचा उत्तम संगम घडवत
सन २०२४/२५ चा तालुकास्तरीय महाआवास योजनेचा दुसऱ्या क्रमाक चे बक्षीस
हागणदारी मुक्त गाव, पर्यावरण संतुलित समृद्ध गाव, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अशा विविध उपक्रम व अभियानात गावाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
श्रीमती इंदुबाई भिला अहिरे
(सदस्य)
श्रीमती सुनंदा संजय चव्हाण
(सदस्य)
श्री. बाळासाहेब लक्ष्मण दळवी (सदस्य)
श्री.मिलिंद केशवराव शेवाळे (सदस्य)
श्री.रंगनाथ मुरलीधर बस्ते
(सदस्य)
श्रीमती.अनुसूया भाऊसाहेब जाधव
(सदस्य)
श्रीमती.नवाबाई साहेबराव दळवी (सदस्य)
1.श्री. सुमित गजानन इंगळे --- ग्राम महसूल अधिकारी
2.श्री. (कोतवाल)
3.श्री.सचिन परशराम बस्ते --- BLO
4.श्रीमती.
5.श्री.विजय देवरे (सहाय्यक कृषी अधिकारी)
🌾 ग्रामपंचायत क्षेत्रफळ
1,017.79 हेक्टर
🏢 वार्ड संख्या
३
👥 पुरुष संख्या
८२६
👥 स्त्री संख्या
७२८
👥 कुटुंब संख्या
३०८
👥 एकूण लोकसंख्या
१५५४